भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचं ‘सामना’ला पत्र
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2017 12:06 AM (IST)
मुंबई: ‘तुमचा अभिप्राय काय आहे हे पुढील तीन दिवसात कळवावं’, अशा आशयाचं पत्र निवडणूक आयोगानं ‘सामना’ला पाठवलं आहे. भाजपाने निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीवर सामनाला आता हे पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिवसेना याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आज नाशिकच्या सभेत याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘‘सामना’वर बंदी आणून दाखवा, मग पाहा काय करतो ते, सामना हे वृत्तपत्र नाही तर आमंच शस्त्र आहे. ‘सामना’ला नख लावला तर महाराष्ट्र पेटून उठेल.’ असं इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. दरम्यान, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना पेपर छापला जाऊ नये, अशी मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली होती. 15 फेब्रुवारी म्हणजे बुधवारच्या अंकात आचारसंहितेचा भंग झाला असून कारवाई करा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपनं निवडणूक आयोगाकडे तसं पत्र दिलं होतं. संबंधित बातम्या: मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?: उद्धव ठाकरे