मुंबई: माजी मंत्री एकनाथ खडसेंचं मंत्रिपद गेल्यानंतर सुरु झालेली धक्क्यांची मालिका अजूनही सुरुच आहे. आता एक नवा धक्का एकनाथ खडसेंना देण्यात आला आहे.

 

एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना मंजूर करण्यात आलेले 1 हजार कोटींचे टेंडर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालात काढले आहेत. या मद्यनिर्मित कंपन्यांना 5 वर्षांसाठी ही टेंडर देण्यात आली होती. पण आता ही टेंडर्स रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हा खडसेंना एकप्रकारे शह दिल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

 

मद्यनिर्मिती क्षेत्रातील काही बड्या कंपन्यांना फायदा पोहोचवण्याच्या दृष्टीनं टेंडर प्रक्रियेचे नियम  ठेवण्यात आल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही सर्व कंत्राट रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.