मुंबई : वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
'झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे'
ईडीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, झाकीर नाईक आणि आयआरएफविरोधारत पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. ही रक्कम कोट्यवधींची असल्याचं कळतं. झाकीर नाईक आणि आयआरएफच्या विविध बँक खात्यांची आणि देणगींचीही चौकशी होणार आहे.