मुंबई : कोरोनाचे संकट देशात आल्या मुळे आगामी गणेशोत्सवात उंच मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये असं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे उंच मूर्ती नसल्याने चार महिन्यांपूर्वी सराफ बांधवांकडे दागिने घडवण्या साठी नोंदवलेल्या ऑर्डर्स मंडळांकडून रद्द झालेल्या आहेत . कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक घडी विस्कटल्याने यंदा घरगुती बाप्पांच्या दागिन्यांची मागणी देखील घटली आहे. त्यामुळे बाप्पाला यंदा दागिन्यांचा साज नसेल हे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांना गिरगावातल्या नाना वेधक यांच्या दागिन्यांचा साज चढविण्यात येतो. कोरोनाच्या संकटामुळे यंदा या कामावर देखील मंदी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं नाना वेधक यांनी सांगितलेलं आहे.


मुंबईतील बहुतांश गणेश मूर्त्यांचे आभूषण गिरगाव च्या नाना वेधक यांचा सुवर्ण कारखान्यात तयार केली जातात. या काळात त्यांच्या कारखान्यात लगबग सुरू असते ती बाप्पांच्या दागिने बनविण्याची, मात्र कोरोना मुळे त्यांच्या चारही कारखान्यात सध्या शुकशुकाट आहे. मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचे सुवर्णालंकार नाना वेधक यांच्याकडून बनवून घेतले जातात. गेल्या 47 वर्षांपासून नाना वेधक आणि त्यांची सतरा कारागिरांची टीम हे काम करत असे. देशावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे यंदा मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे ठरविलेले आहेत. त्यामुळे यंदा बाप्पांसाठी तयार करण्यात येणाऱ्या दागिन्यांची ऑर्डर रद्द झालेल्या आहेत.


गेल्या वर्षीपर्यंत मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळ तसेच दरवर्षी नवीन 30 ते 40 मंडळाचं काम वेधक यांच्याकडे यायचं. बाप्पांचे चरण, आशीर्वादाचे हात, सोड पट्टा यासह असंख्य दागिने कार्यकर्ते आवडीने बनवून घ्यायचे. दरवर्षी वेगवेगळ्या आकारांमध्ये आकर्षक दागिने बनवून घेण्याकडे कार्यकर्त्यांचा कल असायचा. मात्र कोरोनामुळे यंदा सर्वच मंडळांनी भूषण यांच्या ऑर्डर्स रद्द केलेल्या आहेत.


गणेशोत्सवानिमित्त सराफ बाजारात साधारण चार महिने अगोदर बाप्पासाठी आकर्षक आणि विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू लागते. मुकुट, हार, कडे, कंठ्या, तोडे, दुर्वा, बाजूबंद अशा पारंपरिक दागिन्यांच्या ऑर्डर्स दिल्या जातात. मूर्तीची उंची आणि आकाराप्रमाणे खास दागिने तयार करून घेतले जात असल्यामुळे बहुतांशी भक्तांचा कल तयार दागिन्यांऐवजी घडविण्याकडे अधिक असतो. यंदा मात्र सार्वजनिक गणेशमूर्तीच्या उंचीवर चार फुटांची मर्यादा आली आहे. त्यामुळे मंडळांनी देखील दागिने घडवण्याच्या प्रक्रियेकडे यंदा पाठ फिरवली असून नेहमीच्या दागिन्यांनी बाप्पाला मढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मुळे यंदा बाप्पाला दागिन्यांचा साज नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


बाळासाहेब कांबळे (अध्यक्ष लालबाग राजा गणेश मंडळ)


लालबागच्या राजाची आकर्षक गणेश मूर्ती आणि त्याच्यावर बाप्पाच्या सुंदर मनमोहक आभूषणांमुळे लालबागचा राजा अधिकच उठून दिसतो. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक गणेशोत्सव काळात दाखल होत असतात. लालबागच्या चरणी दरवर्षी नवनवीन आभूषण आम्ही तयार करून घेत असतो. मात्र यंदा गणेशोत्सवाच्याऐवजी आरोग्‍य उत्‍सव साजरा करीत असल्यामुळे यंदा बाप्पाची मूर्ती आणि त्यांची दागिने आम्ही बनवून घेतलेली नाहीत. लालबागच्या राजाच्या इतिहासातील अशी घटना प्रथमच घडली आहे. पण कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही यंदा बाप्पाची मूर्ती आणि त्याचे दागिने हे रद्द केलेले आहेत.


अनिल कांबळी (खेतवाडी गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष)


खेतवाडीचा राजाची मूर्ती सोळा फुटी असते. आम्ही नाना वेधक यांच्याकडून बाप्पाचे दागिने तयार करून घेतलेले आहेत. गणेशोत्सवामध्ये ते दागिने आम्ही पॉलिश करून घेतो . काहीवेळा नवनवीन दागिनेही आम्ही तयार करतोय. मात्र यंदा आपल्या सर्वांवर कोरोना संकट असल्यामुळे आम्ही बाप्पाची मूर्ती दोन फुटांची करत आहे. त्यामुळे यंदा खेतवाडीचा राजा या मूर्तीवर जी सुंदर मनमोहक आकर्षक अभूषण दिसायची ती यंदा भक्तांना दिसणार नाहीत.


संबंधित बातम्या :