मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक असलेल्या मुंबईत अवैध धंदे, तस्करी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. अनेकदा या तस्करीला पोलिसांकडून चाफ बसतो. त्यातच, (MumbaI) मुंबई विमानतळावरही (Airport) अवैध सोनं, मौल्यवान वस्तू आणि ड्रग्स, कोकेन यांची तस्करी केली जाते. अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटने 47 कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) एका महिला प्रवाशाकडून सुमारे 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 47 कोटी रुपये आहे.

Continues below advertisement

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी कोलंबोहून मुंबईत आलेल्या महिला प्रवाशाला विमानतळावर थांबवले. तिच्या सामानाची तपासणी केल्यावर कॉफी पावडरच्या नऊ पाकिटांमध्ये लपवलेले पांढऱ्या रंगाचे पदार्थ आढळले. एनडीपीएस फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यावर ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर तत्काळ पुढील सापळा रचून विमानतळावरच त्या कोकेनचा अपेक्षित प्राप्तकर्ता असलेल्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. पुढील तपासादरम्यान या तस्करी साखळीत गुंतलेल्या आणखी तीन जणांना जे या अमली पदार्थांच्या वित्तपुरवठा, लॉजिस्टिक्स, संकलन आणि वितरणाशी संबंधित होते, त्यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे, याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अंमली पदार्थ आणि मनोव्यापारिक पदार्थ (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत. 

हेही वाचा

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिंकदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई

Continues below advertisement