मुंबई नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी डॉक्टर भक्ती मेहेरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तिची कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी तिनही आरोंपीविरोधात अँटी रॅगिंग अक्ट आणि ऍट्रॉसिटी अक्ट अंतर्गत आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.


तसेच अद्याप पोलिसांनी एक डॉ. भक्ती मेहेरला अटक केली असून दोघी फरार आहेत. डॉ. भक्ती मेहेरला पोलिसांनी अटक केल्यानंतर उर्वरीत अंकिता खंडेलवाल, हेमा आहुजा या दोन आरोपांनी सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी सखोल आणि कडक तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना दिले आहे. तसेच आठ दिवसांच्या आत तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेशही दिला आहे.



पायलचे कुटुंबीय गिरीश महाजनांच्या भेटीला

पायलने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पायलच्या आई-वडिलांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. दरम्यान, पायलच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांना अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याचे महाजनांनी सांगितले. तसेच युनिट हेडला निलंबित केल्याचे महाजन यांनी सांगितले.

सदर प्रकरणी चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं गिरीश महाजन यांनी कुटुंबीयांना आश्वासन दिलं आहे.

Dr.Payal Death Case | डॉ. पायलच्या कुटुंबियांच्या भेटीला गिरीश महाजन | मुंबई | ABP Majha



डॉ पायल तडवी आत्महत्येप्रकरणी ठाणे, पालघरमध्ये मोर्चा

डॉ पायल तडवी यांच्या आत्महत्येस कारणीभूत तिन्ही महिला डॉक्टरांवर लवकरात लवकर कारवाई करावी या मुख्य मागणीसाठी ठाण्यात श्रमजीवी संघटनेने मोर्चा काढत आज आंदोलन केले. तसेच अश्या घटना होऊ नये यासाठी एक हेल्पलाईन देखील महाराष्ट्र सरकार ने सुरु करावी अशी मागणी आज करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील तरुणी महिला या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. शिवाजी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता.

तसेच या प्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पालघर येथे तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढून यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी दोषी डॉक्टरांवर काठोरातली कठोर कारवाई व्हावी यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Dr. Payal Tadavi Suicide | पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha



काय आहे प्रकरण?

रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल  तडवी या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली आहे.  मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती.

तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता आदिवासी तडवी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जळगावात आंदोलन केले गेले. तसेच या प्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

डॉ.पायल नायर रुग्णालय मंबईमध्ये शिक्षण घेत होती. 1 मे 2018 रोजी तीला मागासर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी सतत तिचा छळ केला. तिने मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून तिला जातीवाचक टोचून बोलत होते. याबाबत तरुणीने वारंवार डीनकडे तक्रार देखील केली होती. पण तरीसुद्धा त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. पायलच्या आईने देखील या घटनेआधी नायर रुग्णालयाच्या डीनला पत्र लिहून याबाबत कळविले होते.