मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. आत्तापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतून माटुंग्यातील आर. ए. पोदार कॉलेजमधील अनिशा वैशंपायनला वाणिज्य शाखेत 97.23 टक्के गुण मिळाले आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस कॉन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुंबईच्या माटुंग्यातील आर. ए. पोदार कॉलेजमधील अनिशा वैशंपायन या मुलीने वाणिज्य शाखेत 97.23 टक्के गुण मिळाले आहे. तर पेस जुनिअर कॉलेजमधील गौरव गोयलला विज्ञान शाखेत 97.38 टक्के गुण मिळाले आहे.

नागपूरच्या सुविख्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कनक गजभिये या मुलीने विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण मिळविले आहे. तीला 94.7 टक्के गुण मिळाले आहे.

कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यावर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण बोर्डातून 15241 मुली परिक्षेला बसल्या होत्या, त्यातील 14700 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.45 टक्के इतकी आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 90.25 इतकी आहे.

HSC Result 2019 | बारावीचा राज्याचा निकाल 85.88 टक्के; कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी | ABP Majha



राज्यातील तब्बल 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा राज्यभरातून एकूण 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

बारावीचा विभागनिहाय निकाल

पुणे - 87.88 टक्के
मुंबई - 83.85 टक्के
नागपूर - 82.81 टक्के
अमरावती - 87 टक्के
लातूर - 86.08 टक्के
नाशिक - 84.77 टक्के
औरंगाबाद - 87.29 टक्के
कोल्हापूर - 87.12 टक्के
कोकण - 93.23टक्के

शाखानिहाय निकाल

कला - 76.45 टक्के
वाणिज्य - 88.28 टक्के
विज्ञान - 92.60 टक्के