मुंबई : मुंबईच्या डोंगरी भागातील केसरभाई इमारत दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार आणि ट्रस्टवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 नागरिक जखमी झाले होते.
आठवडाभरापूर्वी म्हणजे 16 जुलै रोजी डोंगरीमधील केसरभाई इमारतीचा काही भाग कोसळला होता. प्राथमिक चौकशीत सदर इमारत ही मानांकित प्रमाणांचे उल्लंघन करुन अवैधरित्या बांधण्यात आली असल्याचं आढळून आलं. सरकारतर्फे नवनाथ काळे यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर काळे यांच्या फिर्यादीवरुन ठेकेदार आणि ट्रस्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
VIDEO | मुंबईकर मरतायत...कुणाला सोयरसुतक आहे? | एबीपी माझा
इमारत दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांचं आधीच निलंबन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ही कारवाई केली.
केसरभाई इमारत 100 वर्ष जुनी चार मजली इमारत होती. या इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी आहेत. मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.
VIDEO | मुंबईकरांच्या मरणयातना जवळून पाहणारे 'माझा'चे प्रतिनिधी | मुंबई | एबीपी माझा
संबंधित बातम्या