डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल (18 फेब्रुवारी) लागलेली आग अजूनही धुमसतीच आहे. संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.  या आगीमुळे घाबरलेल्या काही स्थानिकांनी आपला मुक्काम दुसरीकडे हलवला आहे. डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीला काल दुपारी बाराच्या सुमारास आग लागली होती. अद्यापही अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Dombivli Fire | डोंबिवलीतील केमिकल कंपनीला लागलेली आग दहा तासानंतरही धुमसतीच, संपूर्ण शहरावर धुराचे ढग











आगीवर अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. सुरुवातीला स्फोटाचे आवाज आले आणि त्यानंतर प्रचंड धूर हवेत पाहिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सुदैवाने आगीत जीवितहानी झालेली नाही, परंतु मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.