मुंबई : डोंबिवलीतील 'फ्रेंड्स लायब्ररी'ने ऑनलाईन व्यवसायाची दहा वर्ष पूर्ण केली आहेत. अॅपच्या माध्यमातून पुस्तकांची ऑर्डर देता येणारी ही मुंबईतली एकमेव लायब्ररी आहे. दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त 'फ्रेंड्स लायब्ररी' जगभरात कुठेही दिवाळी अंक घरपोच देण्याची सुविधा देत आहे.


ज्या काळी ऑनलाईन शॉपिंगलाही फारशी सुरुवात झाली नव्हती, त्यावेळी लायब्ररीसारखा व्यवसाय ऑनलाईन करण्याचा धाडसी निर्णय पुंडलिक पै यांनी घेतला. या लायब्ररीला आज (29 ऑक्टोबर) दहा वर्षे पूर्ण होत आहेत.

www.friendslibrary.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यात पुस्तकांची लायब्ररी चालवली जाते. वेबसाईटच्या माध्यमातून केवळ काही क्लिक्सवर तुम्ही पुस्तकं मागवू शकता. विशेष म्हणजे घरपोच सेवा देणारी ही महाराष्ट्रातील अनोखी लायब्ररी आहे.

यंदाच्या वर्षी दहा वर्ष झाली त्या निमित्ताने नवीन उपक्रम लायब्ररी हातात घेत आहे. दिवाळी अंक जगभरात कुठेही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. फराळ परदेशात पाठवण्याचा ट्रेण्ड होताच, मात्र आता फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून दिवाळी अंकही परदेशवारी करतील.

येत्या दोन वर्षात घरपोच सेवा देणारी लायब्ररी महाराष्ट्रभर चालू केली जाणार आहे. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे फ्रेंड्स ऑनलाइनला तुम्ही फोनवरुनही पुस्तक ऑर्डर करु शकता. त्याचबरोबर वेबसाईटवर नवीन पुस्तकांची माहिती मिळते.

लायब्ररीमधील ग्रंथसंपदा - 2.5 लाखाहून अधिक पुस्तके
दरवर्षी 150 हून अधिक दिवाळी अंक लायब्ररीमध्ये येतात.
मागणी असलेले विशेष दिवाळी अंक आपण 200+ कॉपी घेतो.
दिवाळी अंक घरपोच देणारी एकमेव लायब्ररी
वेबसाईट- www.friendslibrary.in
फेसबुक पेज - www.facebook.com/friendslibrary