मुंबई : जगातील सर्वात वजनदार महिला इमान अहमदच्या बहिणीच्या आरोपांनंतर डॉ. लकडावाला आणि टीमने तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळं आता इमानला अबूधाबीला नेलं जाण्याची शक्यता आहे.

इमानची बहिण शायमा हिने उपचारानंतर इमानची प्रकृती खालावल्याचे आरोप केले होते. इमानच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्याने तिला हालचाल करता येत नसल्याचा आरोप शायमाने केला होता. तसंच मेडिकल रिपोर्टवर आक्षेपही शायमाने घेतला होता.

इमानचं वजन पाचशेहून 171 किलोंवर, डॉक्टरांचा दावा

दरम्यान उपचारानंतर 500 किलो वजन असणाऱ्या इमानचं वजन मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा डॉ. लकडावाला यांच्या टीमनं केला होता.

इमानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून तिची काळजी घेतली जात आहे. शिवाय तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली असून तिचं वजन 500 किलोंहून 171 किलोंवर आलं आहे, असा दावा डॉ. मुझफ्फल लकडावाला यांनी केला.

इमानला रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयाने तिला दाखल करुन घेताना तिचं वजनही करुन घेतलं नाही. आणि केलं असेल तर त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हान इमानची बहिण शायमा यांनी दिलं होतं.

शायमांचं आव्हान स्वीकारत डॉक्टरांनी तिचं सध्याचं वजन करुन दाखवलं. शिवाय तसं पत्रही डॉ. लकडावाला यांनी दिलं आहे. इमानसाठी शक्य ते प्रयत्न केले, मात्र शायमा यांच्या आरोपांमुळे दुःखी असल्याचंही डॉक्टर म्हणाले.

उपचारासाठी इजिप्तहून 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत आलेल्या इमानचे वजन आधी 500 किलो होतं. पण आता त्यात 262 किलोंची घट होऊन अवघ्या 238 किलोंवर आलं. लकडावाला यांनी आधी इमानच्या डाएटमध्ये बदल करत तिचं वजन 100 किलोंनी कमी केलं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन आणखी वजन कमी करण्यात यश आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

संबंधित बातम्या :

इमानचं वजन पाचशेहून 171 किलोंवर, डॉक्टरांचा दावा


प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर खोटं बोलले, इमानच्या बहिणीचा आरोप