दिवाळीची डेडलाइन उलटून गेल्यानंतरही सरकारने 13 मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ओला, उबर चालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. या संपाविषयी आमदार विद्या चव्हाण यांनी रावतेंना धारेवर धरलं. या संपामुळे सामान्यांचे नव्हे तर आमदारांचेही हाल होत असल्याचं चव्हाणांनी रावतेंना सांगितलं.
यावर रावतेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत चिडून कोण ओला-उबर? कोणी दिली त्यांना परवानगी असा उलट प्रश्न विचारला. तसंच दळणवळणासाठी लोकल, बस, मेट्रोचे असे इतर पर्याय आहेत, असंही दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं. हा वाद कोर्टातला असून मी काय करु, असं म्हणत त्यांनी अखेर काढता पाय घेतला. पण विद्या चव्हाण यांनी सरकार काय करतंय हा पाढा कायम ठेवला.
सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे 30 हजार ओला, उबर टॅक्सीचालक-मालक आजपासून पुन्हा संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे.
दरम्यान, ओला-उबर चालकांचा भारतमाता ते विधानभवन मोर्चा पोलिसांनी गुंडाळला आहे. भारतमाता ते विधानभवन मोर्चा नेण्यास मनाई केली आणि आंदोलकांना पोलीस व्हॅनमधून आझाद मैदानात नेलं.
ओला-उबर चालकांच्या मागण्या
- मिनी, मायक्रो, गो प्रती किलोमीटर 12 रुपये, बेस फेअर 50रुपये, वेटिंग टाईम 2 रुपये मिळावा
- प्राईम, सिडान प्रती किलोमीटर 15 रुपये, बेस फेअर 75 रुपये, वेटिंग टाईम 3 रुपये मिळावा
- xuv, xl, प्रती किलोमीटर 19रु, बेस फेअर 100रु, वेटिंग टाईम 4 रुपये मिळावा
- शेअर, पूल, मायक्रो, या सर्व बुकिंग मिनी आणि गोचा हिशेब (प्रती किलोमीटर 12 रुपये, बेस फेअर 50 रुपये, वेटिंग टाईम 2 रुपये) हा मिळावा
- रेंटल, हायर प्रती तासाला 250रु व 10 किलोमीटर हा मिळावा
- आऊटसाईड बुकिंग 150 किलोमीटरला 2000 रु 150 वरील किलोमीटर मिनी, गो 12 रु. प्राईम, सिडान 15 रु. Xuv, xl 19 किलोमीटर ने धावेल
- दोन (2)किलोमीटर वरील पिकअप फेअर मधे ऐड झाला पाहीजे. त्यामुळे बुकीग कॅन्सल होनार नाही. कंपनीचा व गाडी मालकाचा फायदा होईल
- गाडी पिकअप करण्यासाठी 500 मिटर जरी गेली व पिकअप आल्यावर 5 मिनिटा नंतर बुकीग कॅन्सल झाली तर कॅन्सल फी बेस फेअर च्या स्वरुपात मिळावी
- कंपनीने आपले कमिशन 15%+टॅक्स हा कट करावा
- हे सर्व रेट 24 तास लागू राहतील