Dhirendra Krishna Shastri : 'बागेश्वर धाम सरकार' (Bageshwar Dham) म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्रकृष्ण शास्त्री (Dhirendra Maharaj) यांचा कार्यक्रम आज मीरा-भाईंदरमध्ये होत आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही आज मीरा रोड परिसरात हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला लोकांनी गर्दी केली असून त्यामुळे काहीसा गोंधळही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळात काही भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. या कार्यक्रमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याची दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळत न्यायालयाने या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या कार्यक्रमाला आतापर्यंत जवळपास पाच लाख भाविक जमल्याची माहिती मिळत आहे. हे भाविक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून येथे आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या 18 आणि 19 मार्च असे दोन दिवस मीरा रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. यादरम्यान, धीरेंद्रकृष्ण शास्त्री आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं.
Dhirendra Krishna Shastri : धीरेंद्रकृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाविरोधात न्यायालयात याचिका
धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचा कार्यक्रम होऊ नये म्हणून वकील नितीन सातपुते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असून धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना न्यायालयाने या याचिकेवर कडक ताशेरे ओढताना वकील नितीन सातपुते यांना चांगलंच सुनावलं आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ प्रसिद्धीसाठी याचिका दाखल करणं चुकीचं आहे. तसेच याप्रकरणी नोटीस दिल्याप्रामणे कायद्याचं पालन पोलीसांनी अत्यंत गांभीर्यानं करावं, असंही न्यायालयाने म्हटले आहे.
Dhirendra Krishna Shastri : धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला वाढत्या गर्दीमुळे गोंधळ, काही भाविक जखमी
धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपाहार्य वक्तव्या प्रकरणी महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यक्रमाला कडाडून विरोध होत आहे. त्यांच्या मीरा रोड येथील कार्यक्रमासाठी जवळपास 80 पोलीस तैनात आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली आहे. काही भाविक या गर्दीमुळे गोंधळ झाल्याने जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बागेश्वर धाम सरकार उर्फ धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यांच्या दरबारात जाऊन आले की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे. त्यामुळे सध्या ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. अनेक वादग्रस्त विधानं ही त्यांची चर्चेत आहेत.