मुंबई : धुळ्यातील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात तीन जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीने शिफारस केली आहे. या प्रकरणात स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसील अधिकारी रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले यांच्या विरोधात  एफआयआर नोंदवण्याची समितीने शिफारस केली आहे.


या तिघांकडून कामात अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी शिफारस समितीने केली आहे. जानेवारी 2018 मध्ये धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यानंतर माजी जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?


संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. यात त्यांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.


धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील जवळपास तीन महिन्यांपासून पाठपुरावा केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.


VIDEO | माझा विशेष : धर्मा पाटील यांचे मारेकरी कोण?



संबंधित बातम्या :