Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलण्यात आलं आहे.  आता धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL) चे नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDPL) असे करण्यात आले. धारावी पुनर्विकासासाठी राज्य सरकार आणि अदानी समुह यांच्या संयुक्त भागीदारीत धारावी रिडेव्हलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. मात्र, आता अचानक या कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे. 

Continues below advertisement

अदानी समूहाचा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल), ही धारावीच्या सुधारणेच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर काम करत आहे. मात्र, पुनर्ब्रँडिंगचा भाग म्हणून या कंपनीचे नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDPL) असे करण्यात आले आहे. नवभारत मेगा डेव्हलपर्स नावाची कंपनी या प्रकल्पातील वाढ, बदल आणि भविष्यातील अपेक्षा यासाठी रीब्रँडिंग करणार आहे. या बदलाला या प्रकल्पाच्या संचालक मंडळाची आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. 

सध्या धारावीतील बांधकामांचे सर्वेक्षण सुरु

धारावी पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत अदानी समुहाने बाजी मारली आहे. त्यानुसार अदानी समुहाकडून धारावीचा पुनर्विकास केला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत सध्या धारावीतील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर रहिवाशांची पात्रता निश्चिती केली जाणार आहे. लवकरच या प्रकल्पाला वेग दिला जाण्याची शक्यता आहे. अशा या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि अदानी समूह यांच्या संयुक्त भागीदारीने धारावी रिडेव्हपलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात डीआरपीपीएल नावाने कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीत अदानी समुहाचा 80टक्के तर राज्य सरकारचा 20 टक्के हिस्सा आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत धारावीतील 25 हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Continues below advertisement

सर्व संचालकांना नाव बदलण्याच्या संदर्भातील दिली माहिती

नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एनएमडीपीएल अशी आता या कंपनीची नवी ओळख झाली आहे. एनएमडीपीएलकडून डीआरपीपीएलच्या सर्व संचालकांना कळविण्यात आले आहे. एनएमडीपीएल ही नवीन कंपनी नसून अदानी समुहाची यापूर्वीचीच 23 ऑगस्ट 2023 ची जूनी कंपनी आहे. दरम्यान 17 डिसेंबरला नाव बदलण्यात आले असताना डीआरपीपीएल, धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) वा राज्य सरकार कोणाकडूनही यासंबंधीची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या:

निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?