मुंबई : राज्यातील गावागावातील लोकांना भाजपला समर्थन दिलं आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीआहे.


भाजपला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कोरोना काळात, लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार लोकांच्या पाठिशी खंबरपणे उभं राहिलं आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसह कुणालाही मदत केलेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या महाविकास आघाडी सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊनदेखील भाजप नंबर वनचा पक्ष बनलाय, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


विदर्भात भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आहे. तसेच कोकणातही भाजपने चांगली कामगिरी केली आहे. सिंधुदुर्गात तर जवळपास 80 टक्के ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा केला आहे. राणे कुटुंबिय, रविंद्र चव्हाण आणि इतरांनी प्रचंड मेहनत याठिकाणी केली आहे. आम्ही सत्तेवर असताना देखील आम्हाल रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. मात्र यंदात रत्नागिरीत कामगिरी चांगली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात भाजपने चांगली कामगिरी केली आहे.


शिवसेना ही पॅन महाराष्ट्र पक्ष नाही


शिवसेना ही पॅन महाराष्ट्र पक्ष नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. मात्र भाजपचं असं नाही, भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्हा पक्षांशी या निवडणुकीत लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय


पश्चिम महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश


चंद्रकांत पाटलांच्या खानापूर गावात भाजपच्या पराभवावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  निवडणुकीत असं होतं असतं. एखाद्या गावात कमीअधिक होत असतं. पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांना प्रचंड टार्गेट करण्यात आलं. मात्र याठिकाणी जनतेने भाजपला कौल दिला आहे.  ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगाव खानापुरात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपला शिवसेनेने झटका दिला आहे. शिवसेनेने नऊ पैकी सहा जागांवर विजय मिळवला आहे.


संबंधित बातम्या