Devendra Fadnavis LIVE : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी, दोन तास जबाब नोंदवून पोलिस अधिकारी बाहेर
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांना सायबर गुन्हे शाखेने नोटीस बजावली होती.
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी कारवाई ही सूडबुद्धीने होत असल्याचं भाजपकडून सांगितले जात आहे. दरम्यान यालाच आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत आमच्या कारवाया चुकीच्या आणि तुमच्या कारवाया बरोबर हे कसं? ज्या कारवाया होणार त्या होणारच असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. परळीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडे माध्यमांशी बोलत होते.
विरोधी पक्षनेत्यांना विशेष अधिकार, पोलिस सोर्स विचारु शकत नाहीत, जबाब नोंदवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पोलीस बदली अहवाल फुटी प्रकरण: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी
महाविकास आघाडीत दोन गटारगंगा आहेत त्यातील एक गटारगंगा अजूनही सुरू आहे, त्यामुळे संजय राऊत जे बोलतात त्याला काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस स्वतः चौकशीला सामोरे गेले आहेत हा तमाशा नाही- अतुल भातखळकर
एकमेकांना टार्गेट करणं, नोटिसा देणं अशी परिस्थिती राज्यात कधीच नव्हती, सर्वच पक्षांनी जबाबदारीनं वागण्याची गरज, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन
अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा करु नये, नाहीतर आम्हांला कार्यकर्त्यांना आवरणं मुश्कील होईल-- प्रवीण दरेकर
Devendra Fadnavis Live : दुपारी 12 वाजेपासून देवेंद्र फडणवीसांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत उपस्थित
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीसांनी नोटीस दिली आहे. या नंतर भाजप राज्यभरात आक्रमक झाली आहे .डोंबिवलीमध्ये देखील भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नोटीस जाळून निषेध नोंदवला .यावेळी महाविकास सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलंय. विशेष म्हणजे फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस नंतर भाजप आक्रमक झाली असून आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केल जातय. नाशिकच्या एन डी पटेल रोडवर भाजपच्या मुख्य कार्यालयाबाहेर आमदार देवयानी फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन नोटीसीच्या प्रतिची होळी करण्यात आली. संबंधित दोषी विशेष सरकारी वकीलावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फरांदे यांनी केलीय.
कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?
LIVE : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रमुख नेते उपस्थित, काही वेळात चौकशी होणार
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस केवळ माहिती घेणार आहेत, त्याचा इतका गोंधळ करायची काय गरज आहे? ईडी, आयकर विभाग, केंद्रीय तपास यंत्रणा यांचा वापर करता आणि इथं पोलिसांनी साधी माहिती घ्यायची नाही का? - छगन भुजबळ
Devendra Fadnavis LIVE : फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांचं पथक सागर बंगल्यावर दाखल, पोलिस बदली अहवाल लीक प्रकरणी चौकशी
मलबार हिल परिसरातील स्थानिक डीसीपी योगेश कुमार गुप्ता सागर बंगल्यावर आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी आता तर एकच बॉम्ब फोडला आहे... त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र असून येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील असा दावा भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय... ते नागपुरात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळेला बोलत होते... पोलिसांच्या बदली संदर्भातला अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी ची नोटीस दिली आहे... त्याच नोटिशीचा निषेध करण्यासाठी नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले... तसेच फडणवीसांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसाची प्रतिकात्मक होळी ही केली... विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांना सरकार मधला भ्रष्टाचार आणि नियमबाह्य गोष्टी बाहेर आणण्याचा घटनात्मक अधिकार आहे... त्याचा अधिकारान्वये फडणवीस वेगवेगळी माहिती विधिमंडळात आणि जनतेसमोर मांडत असल्याचे बावनकुळे म्हणाले... त्यामुळे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी ती माहिती कुठून आणली हे विचारण्याचा अधिकार सरकारला नाही... सरकारकडे स्वतःची यंत्रणा आहे... सरकारने फडणवीस यांनी समोर आलेली माहिती खरी की खोटी याची चौकशी करावी असं बावनकुळे म्हणाले....
Solapur News : देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसीची भाजप कार्यकर्त्यांकडून होळी
सोलापूरातल्या पूर्व भागातील दत्त नगर परिसरात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन
भाजपा कार्यकर्त्यांची राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
भाजप आमदार कालिदास कोळंबकर, नितेश राणे, प्रसाद लाड सुद्धा सागर बंगल्यावर
राज्य सरकारचं आमच्यावर प्रेम, सकाळी गुड मॉर्निंगच्या मेसेजप्रमाणे हल्ली आम्हाला नोटिसा येतात, आम्ही हिंदुत्वाची बाजू मांडलीय, घाबरत नाहीत- नितेश राणे
फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांनी चौकशी सुरू केल्याच्या विरोधात नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकावर निषेध आंदोलन सुरू केले आहे... फडणवीसांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीची यावेळी होळी केली जाणार आहे....
Akola News : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठविण्याच्या विरोधात अकोल्यात आज सकाळी भाजपनं आंदोलन केलंय. यावेळी गांधी चौकातील भाजप कार्यालयासमोर या नोटीसची होळी करण्यात आलीय. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्ष रणधीर सावकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय.
फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते) यांना नोटीस बजावण्यात आली असून चौकशीसाठी त्यांना आज बोलाविण्यात आले आहे. याचा निषेध म्हणून झरे ता.आटपाडी येथे राज्य सरकारच्या या कृत्याविरोधात आमदार गोपीचंद पडळकर ,पदाधिकारी व ग्रामस्थांनी नोटीसीचे दहन करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलीसांनी दिलेल्या नोटिसच्या विरोधात पुणे भाजपचे महापालिकेसमोर आंदोलन.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी साधारणपणे 11 वाजता पोहोचण्याची शक्यता आहे. माञ अजूनही बीकेसी पोलीस ठाण्यात कसलीही हालचाल नाही. त्यामुळे आता चौकशीसाठी जाणारी टीम ही थेट सीपी ऑफीसहून सागर बंगल्यावर पोहचण्याची शक्यता आहे. सध्या बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर मोठया प्रमाणत बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. आज दुपारच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर जमण्याची शक्यता आहे. त्यामुळें अजूनही याठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.
Akola News : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठविण्याच्या विरोधात अकोल्यात भाजपचं आंदोलन. गांधी चौकातील भाजप कार्यालयासमोर केली नोटीसची होळी. भाजप कार्यकर्त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात घोषणा.
त्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "सहपोलीस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !"
दरम्यान फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची होळी भाजपतर्फे करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
Devendra Fadnavis News Updates : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. त्यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार नाहीत तर पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन चौकशी करणार आहेत. याबाबत फडणवीसांनी ट्वीट करत माहिती दिली.
पार्श्वभूमी
Devendra Fadnavis News Updates : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. त्यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार नाहीत तर पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन चौकशी करणार आहेत. याबाबत फडणवीसांनी ट्वीट करत माहिती दिली.
बीकेसी पोलीस ठाण्यातले कर्मचारी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जात त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी फडणवीसांना बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर फडणवीसांनीही आपण हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीसच फडणवीसांच्या घरी जात जबाब नोंदवून घेणार आहेत.
फडणवीसांच्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक
दरम्यान फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची होळी भाजपतर्फे करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
फडणवीसांचं ट्वीट, पोलिसच चौकशीसाठी घरी येणार
त्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "सहपोलीस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !"
काय आहे फोन टॅपिंग प्रकरण
फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडली. यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात शुक्लां यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून 25 मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
- पेनड्राईव्ह बॉम्ब प्रकरणी नवा खुलासा, स्टिंग ऑपरेशनमध्ये पत्रकार आणि पोलीस काँस्टेबलचाही समावेश?
- Devendra Fadnavis: घड्याळ अडचणीत आले म्हणून राजकीय सूडबुद्धीने फडणवीसांना चौकशीला बोलावलं : भाजप
- विरोधी पक्षनेत्यांकडे पुरावे असतात, ते त्यांनी द्यावे; जयंत पाटलांचं आव्हान
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -