मुंबई : आज अधिवेशनात वीजबिल माफीसह इतर मुद्द्यांवरुन भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले.  अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन केलं. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देखील सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी खासकरुन राज्यपाल आणि सरकारमधील वादावर भाष्य केलं.


'वीज तोडणी तात्काळ थांबवा', विधानसभेत वीजबिलाबाबत अजित पवारांची महत्वाची घोषणा


राज्यपाल आणि सरकार हा वाद महाराष्ट्राला नवीन नाही. अंतुले, विलासराव देशमुख यांच्या काळातही वाद झाला. पण अशी अवस्था आली नाही, की राज्यपाल विमानात जाऊन बसले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला परवानगी नाही. राज्यपाल व्यक्ती नाही पद मोठं आहे. रोज ज्या राज्यपालांना अपमानित करतो त्यांचा अभिनंदन प्रस्ताव येतो तेव्हा समाधान वाटतं, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


'...तर सरकारच्या डोक्यात पंप घालू', वीजतोडणी विरोधात अधिवेशनात भाजपचा आक्रमक पवित्रा


ते म्हणाले की, मुख्यमंत्री की राज्यपाल यापैकी कुणाला विमान द्यायचं तर राज्यपालांना विमान देतात. मला कळत नाही. राज्यपाल गेले, विमानात इंधन होतं. परवानगी नसताना बोर्डिंग पास कसा मिळाला. राज्यपाल आणि आपल्यात मतभेद असतील पण मनाचा कोतेपन इतका चांगला नाही. राज्यपाल व्यक्ती नाही पद मोठं आहे. मी राज्यपाल यांचे भाषण ऐकलं. वाचलं. त्यांचे भाषण कोणत्या श्रेणीत पडतं? यात यशोगाथा नव्हती वेदना आणि व्यथा दिसतात. आपली बाजू मांडताना त्यात आकडे सत्य सांगितले पाहिजे. पण ते दिसत नाही. चौकात भाषण करतो तस भाषण राज्यपालांना पाठवलं, असं ते म्हणाले.


माझे कुटुंब माझी जबाबदारी वर बोलताना फडणवीस म्हणाले की, आता माझी जबाबदारी म्हणजे सरकारची जबाबदारी नाही. सरकारने हात झटकले अशी अवस्था पाहायला मिळते. राज्यपाल अभिभाषण पुढच्या एक वर्षात काय करणार दिशा दाखवतो पण त्यात काहीच पहायला मिळत नाही. यमक जुळणारी भाषा यशाचे गमक होऊ शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले.


ते म्हणाले की, देशातील चाळीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 35% मृत्यू महाराष्ट्रात आहेत. तरीही हे कशाची पाठ थोपटून घेतात. आता रुग्णसंख्या खरी आहे की वाढवली. आज ज्याच्या मनात येत मंत्री जातो, अधिकारी जातो आणि लॉकडाऊन करून टाकतो. लॉकडाऊन करण्यासाठी सगळे तयार बसले आहेत.