मुंबई : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाच्या विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्हमध्ये सोमवारी रात्री काही आंदोलकांकडून विनापरवानगी प्रदर्शन करण्यात आलं.  यावर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करत 22 ते 25 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील 10 लोकांची ओळख पटवून पुढील तपास सुरू केला आहे.


दिल्ली मध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निर्देशानंतर मुंबईमध्ये काटेकोर सुरक्षा करण्यात आली आहे. याच अनुषंगाने मुंबईमध्ये रात्री मरीन ड्राईव्ह येथे विना परवानगी काही आंदोलकांनाकडून आंदोलन करण्यात आले. यावर मुंबई पोलिसांकडून या सक्तीने कारवाई करत तपासात अधिक वेग आणला आहे. आत्तापर्यंत असून 22 ते 25 लोकांनावर गुन्हा नोंदवला असून 10 लोकांची ओळखसुद्धा पटली आहे. याचा पुढील तपास सुरू केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर असतानाच राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. दिल्लीच्या जाफराबाद परिसरात काल (24 फेब्रुवारी) भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण आहे. कालच्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांमध्ये 144 कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दिल्लीच्या जफराबाद, मौजपूर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला हिंसक वळण आलं. हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांमध्ये 144 कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

यावरुनच मुंबई पोलीसचे डीसीपी संग्रामसिंह निसानदार यांनी मरीन ड्राईव्हमध्ये आंदोलकांना समजवण्याचा खूप प्रयत्न  केला, की तुम्ही हे आंदोलन इथे करू नका सामन्यांना याचा त्रास होइल. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. ज्यामुळे पोलिसांना नाईलाजाने हलकं बल प्रयोग करून त्यांना तिथून हटवल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

मुंबई पोलिसांच्या याच सतर्कतेमुळे इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत शांतीपूर्ण आंदोलन पार पडली आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे ,की एखाद्या आंदोलनाची परवानगी सर्व बाबी तपासल्यावरच दिली जाईल.