नवी मुंबई: देशाला बाह्य शक्तींकडून धोका नसून अंतर्गत फुटिरवाद्यांकडून धोका आहे, असं मत देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केलं. या फुटिरवाद्यांचा लोकांनी समाचार घ्यावा, असंही ते म्हणाले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर काल माजी सैनिक आघाडीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याच्या दरम्यान बोलत होते.


 

काही लोकांना 'भारत माता की जय' म्हणण्यात काय अडचण आहे? असा सवालही पर्रिकर यांनी विचारला, गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा बराच गाजत आहे. दरम्यान, पर्रिकर यांनी काँग्रेसवरही बरीच टीका केली.

 

संरक्षण खात्यातील सामग्री खरेदीतील दलाली हा गंभीर विषय असून मागील सरकारच्या काळात याचा सुळसुळाट होता. असं सांगून पर्रीकरांनी काँग्रेसवर निशाणा साधला. याव्यतिरीक्त, मॅरिड एकोमोडेशन कायद्याअंतर्गत मागील दीड वर्षात आपण २४ हजार सैनिकांना त्यांच्या स्पेस सेंटर मध्ये घर दिलं असून पुढील दोन वर्षात ६९ हजार सैनिकांना घर देण्याचं लक्ष असल्याचं ही पर्रिकर यांनी स्पष्ट केलं.