Defamation Notice to Aditya Thackeray: दिशा सालियन (Disha Salian), सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना 19 हजार 70 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे. उच्च न्यायालयातील शपथपत्रांमध्ये खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच, याचिकाकर्ते आणि साक्षीदारांकडून उत्तर प्रदेशात केस दाखल करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, रिपब्लिकन टीवीचे अर्णब गोस्वामी, सुशांत सिंह राजपूत फॅन्स, प्रकरणातील साक्षीदार, तक्रारकर्ते या सर्वांकडून आदित्य ठाकरेंविरुद्ध देशभर केसेस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याचिका कर्त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांनांही न्यायप्रविष्ठ हत्येच्या प्रकरणाला आत्महत्या न संबोधण्याचं आवाहन केलं आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, रिपब्लिकन टीवीचे अर्णब गोस्वामी, सुशांत सिंह राजपूत फॅन्स, प्रकरणातील साक्षीदार, तक्रारकर्ते या सर्वांकडून आदित्य ठाकरेंविरुद्ध देशभर केसेस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याचिका कर्त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांनांही न्यायप्रविष्ठ हत्येच्या प्रकरणाला आत्महत्या न संबोधण्याचं आवाहन केलं आहे.


दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध सामुहिक बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील सहभागाचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, तरीदेखील कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्यानं आदित्य ठाकरेंना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात यावेत, यासाठी एक जनहीत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून त्यांचंसुद्धा म्हणणं ऐकावं आणि त्यांनादेखील उत्तरवादी बनवावं, अशी मागणी केली आहे. 


राशिद खान पठाण यांची मूळ याचिका काय? 


बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राशिद खान पठाण यांनी एक याचिका दाखल केली आहे. 8 जून 2020 रोजीच दिशा सॅलियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं.


सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, खोटे शपथपत्र दाखल केल्याचा आरोप