मुंबई : घोड्यावरुन सैर करणं मुंबईतील कुलाब्यातल्या पालकांना जास्तच महागात पडलं आहे. कारण यामध्ये त्यांच्या 6 वर्षांच्या मुलीचा घोड्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात ही घटना घडली आहे.
कुलाबा परिसरात घोड्यावरुन सैर करत असताना 6 वर्षीय मुलगी अचानक खाली पडली. त्याचवेळी घोडा देखील तिच्या अंगावर कोसळल्यानं मुलीला जबर दुखापत झाली. या अपघातानंतर तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यातही आलं पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान या भागात जवळपास 18 घोडे आहेत आणि कोणतेही सुरक्षा उपाय न करता घोड्यांची सैर घडवली जाते. अशी माहितीही आता पुढे आली आहे.
याप्रकरणी घोड्याच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घोड्यावरुन पडून 6 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2017 11:28 AM (IST)
घोड्यावरुन सैर करणं मुंबईतील कुलाब्यातल्या पालकांना जास्तच महागात पडलं आहे. कारण यामध्ये त्यांच्या 6 वर्षांच्या मुलीचा घोड्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -