मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये 13 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2017 05:32 PM (IST)
कालच्या पावसामुळं मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई/ ठाणे/ पालघर : काल दिवसभर मुंबई आणि उपनगरांना झोडपणाऱ्या पावसाचा क्रूर चेहरा आज उघड झाला आहे. कारण कालच्या पावसामुळं मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विक्रोळीमध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. तर ठाण्यामध्ये कालपासून 4 जण वाहून गेलेत. याशिवाय कालच्या पावसात नेमके किती बेपत्ता झाले आहेत, याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. दुसरीकडे पालघरमध्ये देखील पावसानं कहर केला असून, आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. डहाणू आणि बोईसर परिसरात मुसळधार पावसात 4 जण वाहून गेले. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरू आहे. तर आज सकाळी विनोद दळवी नावाचा तरूण जव्हार परिसरातल्या नाल्यातून वाहून गेला. नरू वळवी नावाचा मुलगा बोटीनं सातपाटी येथे जात असताना बुडाला आहे. संबंधित बातम्या