मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांनी धक्का दिला आहे. दाऊदचा पुतण्या रिझवान कासकरला अटक करण्यात आली आहे. खंडणी मागण्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. खंडणी मागून तो देश सोडण्याच्या इराद्यात असतानाट मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मुंबई विमानताळावरुन अटक केली आहे.


मुंबईतल्या दोन व्यापाऱ्यांमध्ये पैशाच्या देवघेवीवरुन वाद होता. यातील एका व्यापाऱ्याने दुबईतील डी कंपनीच्या संपर्कात आला. त्यानंतर फहीम मचमच नावाच्या व्यक्तीला मदत मागितली होती. व्यापाऱ्याने फहीमच्या साथीने दुसऱ्या व्यापाऱ्याला धमकावलं. तसेच त्याना सर्व पैसे विसरण्यास सांगितले.



त्यानंतर मुंबईतून पुतण्या रिझवान कासकरने व्यापाऱ्याला धमकवण्यासल सुरुवात केली. काही दिवसांनी व्यापाराला रिझवानने या दोन्ही दुबईला नेऊन वाद मिटवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र या दरम्यान व्यापाऱ्याला आपले पैसे मिळणार नसल्याची शंका आल्याने त्याने थेट खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणातील पढील तपास गुन्हे शाखा करणार आहे.