Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या आणि ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.  दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी दोन्ही गटांनी केलीय. उद्या (5 सप्टेंबर) होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर या मेळाव्यासाठी पोलिसांनी देखील  विशेष प्लॅन केला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दसरा मेळाव्यात खास बंदोबस्त करण्यात येणार आहे. वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची आणि अंमलदारांची नियुक्ती मेळाव्यात करण्यात आलेली आहे.

  


पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची आणि अंमलदार यांची दसऱ्या मेळाव्यात विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करावी, असे आदेश जारी केले आहेत.  दसरा मेळाव्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. बीकेसी मैदानात मुंबई पोलिसांसाठी एक मॉनिटर रुम तयार करण्यात आले आहे. जवळपास दोन ते अडीच हजार अधिकारी आणि अंमलदारांची नियुक्ती बीकेसीमध्ये असणार आहे, तर तेवढ्याच संख्येते शिवाजी पार्क येथे देखील अधिकारी आणि अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. फक्त मुंबई पोलिसच नाही तर स्पेशल युनिट, एसआरपीएफच्या टीम्स, रॅपीड अॅक्शन फोर्स, एटीएस या टीम दसरा मेळाव्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. दोन्ही गटांचा दसरा मेळावा शहरात कोणताही अनुचित प्रकार न होता सुरळीत पार पडावा, यासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना करत आहेत.


दोन्ही गटांकडून जय्यद तयारी


कल्याण डोंबिवलीमध्य दोन्ही गटातील कार्यकर्ते पदाधिकारी या मेळाव्यासाठी सज्ज झालेत. शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रत्येक ठिकाणी बैठका सुरू असून बीकेसी येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवली मधून आत्तापर्यंत 200 बसेस बुक झाल्यात किमान दहा हजार कार्यकर्ते कल्याण डोंबिवलीहून या मेळाव्याला जाणार आहेत. अजूनही लोकांचा संपर्क होतोय. त्यामुळे आम्हाला आता बसेस अपुरा पडू लागल्यात, असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुख सचिन बासरे यांनी कल्याण मधून अडीच हजार कार्यकर्ते हे ट्रेनने शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात जाणार आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी कल्यान ग्रामीण, डोंबिवली मधून देखील दोन ते अडीच हजार कार्यकर्ते ट्रेनने दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याचे सांगितलं. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाची जोरदार तयारी, कल्याण-डोंबिवलीतून 200 हून अधिक बस बुक