मुंबई : मुंबईसह देशभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अनेक ठिकाणी त्याचं उल्लंघन होत आहे. मात्र यातही माहीम परिसरात एका गोविंदा पथकाने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे.
वांद्र्यातील जरीमरी गोविंदा पथकाने तीन थर रचून माहीम दर्ग्याला सलामी दिली. तसंच यावेळी बाबा मखदूम शाह की जय असा नाराही दिला.
खरंतर प्रत्येक सण हा ऐक्याचं, एकतेचं प्रतिक असतो. माहीममधील बाबा मखदूम शाह यांच्या दर्ग्याला सलामी देऊन जरीमरी गोविंदा पथकाने प्रत्येक भारतीयाल धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला.