मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलेलं ४ आठवड्यांचं संरक्षण ही त्यांची अखेरची संधी असेल, कारण तुम्हाला कोर्टानं आधीच पुरेसा वेळ दिलेला आहे. असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारपर्यंत डीएसकेंना अटकेपासून दिलासा दिला आहे.


‘लोकांना त्यांचे पैसे परत हवेत म्हणून ते तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुमची अटक त्यांनाही नको हे ध्यानात ठेवा. तुम्हाला तुमच्या व्यवसायात तोटा झाला याच्याशी गुंतवणुकदारांचा काहीही संबंध नाही.’ या शब्दांत हायकोर्टानं डीएसकेंना सुनावंल. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. सोमवारी या प्रकरणातील तपास अधिकऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आहेत. तसेच नेमकी किती रकमेची देणी बाकी आहेत याची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

अटकपूर्व जामीनासाठी डीएसके पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयासमोर आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशांप्रमाणे डीएसकेंनी ५० कोटी रूपये १९ डिसेंबरपर्यंत जमा करण्याची कबुली दिली होती. ती पूर्ण न करु शकल्याने डीएसकेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. पण ही मुदत संपायला काही तास उरसेले असताना अजूनही डीएसके यांनी ५० कोटी रुपये भरलेले नाहीत. तपास अधिकाऱ्यांनी आपले सर्व प्रकारचे व्यवहार, खाती सील केल्यानं तात्काळ इतकी मोठी रक्कम उभी करण्यात अडचणी असल्याचा पुनरूच्चार डीएसकेंच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला.

कबूल केलेल्या मुदतीत पैसे न भरल्यास अटकेपासून हायकोर्टानं देलेलं संरक्षण आपोआप रद्द होईल असं हायकोर्टानं आधीच स्पष्ट केले होते. या आदेशांना डीएसकेंनी तयार दर्शवली होती. डीएसकेंकडून कोर्टात त्यांच्या विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या ६ संपत्तींची यादी हायकोर्टात सादर केली होती. मात्र, या सर्व संपत्ती बँकांकडे गहाण असल्याची माहीती सरकारी वकिलांनी कोर्टाला करुन दिली होती. यावर संताप व्यक्त करत हायकोर्टानं डीएसकेंची चांगलीच खडरपट्टी काढली होती.

इतक्या वर्षांत कमवलेला रोख नफा थकीत रकमेच्या २५% म्हणून तातडीनं जमा करा अन्यथा आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावा लागले असं स्पष्ट करत हायकोर्टानं डीएसकेंना हा अवधी दिला होता. त्यानंतर डीएसकेंचे वकील आणि जेष्ठ कायदेतज्ज्ञ अशोक मुंदरगी यांनी डीएसके स्वत:च्या मालकीच्या संपत्ती विकून लोकांचे पैसे परत करण्यास तयार असल्याचं सांगितलं.

संबंधित बातम्या :

अटकपूर्व जामीनासाठी डीएसके पुन्हा हायकोर्टात

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट