मुंबई : गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये 6 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. या सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई पालिकेकडून करण्यात आली आहे. या पुलाच्या ऑडिटसंबंधी जबाबदार दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

या दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता ए.आर पाटील, सहाय्यक अभियंता एस. एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर मुख्य अभियंता एस. ओ कोरी आणि उपमुख्य अभियंता आर . बी  तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर हा पूल  धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या जे.डी देसाई या कन्सल्टंटला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून समजले आहे.

VIDEO | मुंबई पूल दुर्घटना: आयुक्तांचा पत्ता नाही तर अतिरिक्त आयुक्तांचा पळ | मुंबई | एबीपी माझा


सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघलांचा पळ, तर आयुक्त अजॉय मेहतांचा पत्ता नाही
हा पूल मुंबई महापालिकेचाच असल्याचे महापालिकेने कबूल केले आहे. या घटनेबाबत विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी पालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु पालिकेचे अधिकारी याबाबत बोलणे टाळत आहेत. तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हे माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पळ काढत असल्याचे आज पाहायला मिळाले. दरम्यान महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने दुर्घटनेची कोणतीही जबाबदारी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्वीकारलेली नाही.काल (गुरुवारी )संध्याकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर स्थानिक नगरसेविका सुजाता सानप आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा पूल रेल्वेचा असल्याचे सांगून दुर्घटनेची जबाबदारी नाकारली. त्यानंतर हा पूल पालिकेचाच असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटनेनंतर अडीच तासांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले की तो पूल पालिकेचाच आहे. पालिका एवढ्यावरच थांबलेली नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती.




संबंधित बातम्या


पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी


मुंबई पूल दुर्घटना : मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री 


सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे 


बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका


पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप


'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे


रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली