मुंबई : हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक सीएसटीपासून गोरेगावपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अंधेरीपर्यंत कार्यरत असलेली हार्बर सेवा पुढील वर्षीपासून गोरेगावपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
चर्चगेटहून परेलपर्यंत नवीन ट्रॅक टाकायला जागाच नसल्यानं चर्चगेटहून मध्य रेल्वेसाठी ट्रेन सुरु करणं अशक्य असल्याचं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने चर्चेगेटहून ठाणे-डोंबिवलीपर्यंत मध्य रेल्वे सुरु का करत नाही, अशी विचारणा
रेल्वे प्रशासनाला केली होती.
रेल्वे सुरक्षेसंदर्भात हायकोर्टातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुंबई पोलिस, जीआरपी, आरपीएफ, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे जीएम उपस्थित होते. जस्टिस विद्यासागर कानडे आणि नूतन सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. समीर झवेरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने बैठक बोलवली होती.
मुंबई ही अजूनही देशाची आर्थिक राजधानी आहे. दररोज 80 लाख प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात, असंही यावेळी हायकोर्टाने सांगितलं. रेल्वे प्रवाशांची संख्या ही युरोपातील एखाद्या देशाइतकी असल्याचंही कोर्टाने सांगितलं.