मुंबई: मुंबईतील सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी विमानतळ या दोन्हींची नावं बदलली जाणार आहेत. आता या दोघांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असा होईल.

आधीच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावात ''महाराज'' या शब्दाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या नामकरणाला राज्य सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनसचा इतिहास:

  • 1887 साली बांधकाम, याआधी व्हिक्टोरिया टर्मिनस असं नाव होतं.


 

  • व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या जंयतीनिमित्त हे स्थानक बांधण्यात आला होता.


 

  • मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन, मध्य रेल्वेचं मुख्यालय