मुंबई महापालिकेच्या रिंगणात 1641 पैकी 216 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर 154 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
यामध्ये प्रामुख्याने शिवसेना पहिल्या, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय मनसे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
शिवसेनेच्या 173 पैकी 41 उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे असल्याचं आढळून आलं आहे. तर 28 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
काँग्रेसच्या 171 पैकी 19 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर केली आहे. तर 16 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
मनसेच्या 154 उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. तर 22 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
भाजपच्या 151 उमेदवारांपैकी 23 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती सादर केली आहे. तर 14 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्रवादीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार देण्यात मागे नाही. मुंबईत राष्ट्रवादीच्या 132 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे. तर 16 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.