अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला मागील वर्षीपासून तडे गेले असून वर्षभरानंतरही या धरणाची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे धरण फुटलं, तर लाखो लोकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होते आहे.
ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे अर्थात जीआयपी कंपनीनं कल्याण स्टेशनच्या निर्मितीपूर्वी अंबरनाथ एमआयडीसीत हे जीआयपी धरण उभारलं होतं. त्यावेळी कोळशाच्या इंजिनांसाठी लागणारं पाणी इथून गुरुत्वाकर्षणाने कल्याणला वाहून नेलं जात होतं. कालांतरानं कोळशाची इंजिनं बंद झाली आणि हे धरण दुर्लक्षित झालं.
काही वर्षांपूर्वी इथे रेल नीरचा कारखाना सुरू करण्यात आला असून त्यासाठी धरणातून दिवसाला दोन लाख लिटर पाणी उचललं जातं. मागील वर्षापासून या धरणाच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून याबाबत तक्रारी करूनही अजूनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हे धरण फुटलं, तर एमआयडीसीतील अनेक गावांना धोका असून त्यामुळे रेल्वे इथून केवळ उत्पन्न मिळवते आहे. मात्र स्थानिकांच्या जीवाला निर्माण झालेल्या धोक्याशी त्यांना काही देणं-घेणं नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2017 04:08 PM (IST)
अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला मागील वर्षीपासून तडे गेले असून वर्षभरानंतरही या धरणाची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे धरण फुटलं, तर लाखो लोकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होते आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -