मुंबई : आपल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे अनेकदा मुंबई पोलीस चर्चेत असतात. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना नागरिकांनी पुन्हा एकदा खबरदारी बाळगावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे. त्यावर सीपी मुंबई पोलिसांनी एक इंटरेस्टिंग ट्वीट करत कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी नवीन लिंगोस लक्षात ठेवावं असं आवाहन केलं आहे. (CP Mumbai Police tweet on Coronavirus).


सीपी मुंबई पोलीस या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट करताना पोलिसांनी म्हटलं आहे की, आपल्या दैनंदिन जीवनातील लिंगोसचा अर्थ आता बदलत आहे. कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करायचं असेल तर हे नवीन लिंगोस लक्षात ठेवा.


ओबे प्रोटोकॉल, प्रिकॉशन ओव्हर व्हायरस, मास्क इन अॅक्शन, फर्स्ट पर्सन सेफ्टी अशा चार प्रकारचे लिंगोस मुंबई पोलिसांनी शेअर केले आहेत. यातून कोरोनाच्या प्रत्येकाने नियमांचे पालन करावं, काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा आणि व्यक्तीच्या किंवा स्वत: च्या सुरक्षेला सर्वात प्राधान्य द्यावं असा संदेश मुंबई पोलिसांनी दिला आहे. 


 






या नव्या लिंगोसच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे. 


मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे बरेच ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबई पोलिसांनी कोरोना संसर्गापासून बचावापासून अनेक गोष्टींबाबत उत्तम ट्वीट केले आहेत. चित्रपटातील डायलॉग, वर्तमानातील घडामोडी, गेम्ससह विविध विषयांचा धागा पकडून केलेल्या ट्वीटचं नेटिझन्सनीही कौतुक केलं आहे.


महत्वाच्या बातम्या :