Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) आज 65 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी असून काल 78 नवे रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 65 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 89 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 576 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 65 रुग्णांपैकी 08 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार 858 बेड्सपैकी केवळ 619 बेड वापरात आहेत. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर 5983 वर पोहोचला आहे.
राज्यात 535 नवे कोरोनाबाधित
राज्यातील कोरोनाचा (Maharashtra Corona Cases) प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मागी 24 तासात राज्यात कोरोनाच्या 535 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसंच राज्यात आज 10 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात गेल्या 24 तासात 963 रुग्णे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसंच राज्यात आज 454 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. ज्यामुळे सध्या राज्यात 932 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
मुंबईत लोकल प्रवासासाठी संपूर्ण लसीकरण अनिवार्य
मुंबईत लोकलसह सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं नागरिकांना बंधनकारक ठेवण्यात आलं आहे. याची नोंद घेत 1 मार्च रोजी तयार केलेली कोरोना निर्बंधांबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यास राज्य सरकारला हायकोर्टानं परवानगी दिली आहे. लोकल प्रवासासाठीच्या लससक्ती विरोधातील याचिका हायकोर्टानं बुधवारी निकाली काढली. मात्र नव्या नियमावलीला पुन्हा कोर्टात आव्हान देण्यास याचिकाकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Coronavirus Cases Today : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय! देशात गेल्या 24 तासांत 6396 नवे कोरोनाबाधित, 201 मृत्यू
- Unlock Guidelines : लसीकरणावर भर द्या, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; असे असतील निर्बंध!
- Unlock Guidelines : लसीकरणावर भर द्या, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; असे असतील निर्बंध!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha