Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनारुग्णांची(Mumbai Corona Update) संख्या मागील काही दिवस अतिशय कमी आढळत असताना कालपासून यात किंचित वाढ होत आहे. आज ही संख्या 50 च्या पुढे गेली असून नव्या 54 रुग्णांची आज नोंद झाली आहे. काल 46 बाधित आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार नवे 54 कोरोनाबाधित आढळले असून 73 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 258 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा विस्फोट झालेल्या धारावीमध्ये आज 1 एप्रिल,2020 नंतर पहिल्यांदाच सक्रीय रुग्णसंख्या शून्य झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 54 रुग्णांपैकी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 402 बेड्सपैकी केवळ 27 बेड सध्या वापरात आहेत. 



राज्यात 139 नवे कोरोनाबाधित


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज पहिल्यांदा ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 965 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. याशिवाय राज्यात आज नवे 139 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 255 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत.  


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha