Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनारुग्णांची(Mumbai Corona Update) संख्या मागील काही दिवस अतिशय कमी आढळत होती. 30 हून कमी कोरोनाबाधित आढळत असताना आज ही संख्या किंचित वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार नवे 46 कोरोनाबाधित आढळले असून 44 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 277 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 46 रुग्णांपैकी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 402 बेड्सपैकी केवळ 31 बेड सध्या वापरात आहेत. 



राज्यात 149 नवे कोरोनाबाधित


राज्यातील आज 149 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात  222 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज  दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,23, 959  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 90, 68, 319  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha