Mumbai Corona Update : मुंबईत मागील काही दिवस सातत्याने रुग्णसंख्या कमी होत आहे. दरम्यान सोमवारी तर 356 रुग्ण आढळले होते. मागील काही दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या होती. आज या रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये 447 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 447 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 783 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 808 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत 48 दिवसांची वाढ यात झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.09% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
सध्या मुंबईत केवळ दोन इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 447 रुग्णांपैकी 64 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 018 बेड्सपैकी केवळ 1 हजार 336 बेड वापरात आहेत.
मुंबईतील रात्रीची संचारबंदी मागे
मागील काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रग्णसंख्या घटल्यानं मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून, मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. तसेच मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.
हे ही वाचा :
- Coronavirus Cases Today : कोरोनाबाधितांमध्ये घट मात्र मृत्यूचे प्रमाण वाढते, देशात गेल्या 24 तासांत 67 हजार 597 नवे रुग्ण
- Omicron Origin : खरंच उंदरातून माणसांमध्ये आला ओमायक्रॉन?, अभ्यासातील दावा
- कोरोनाकाळात रुग्णांकडून घेतलेले जास्तीचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करणार, जिल्हा शल्यचिकित्सकांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha