Mumbai Corona Update :  मुंबईतील कोरोनारुग्णांच्या (Mumbai Corona Update) संख्येत आजही घट झाली आहे. आज नवे 44 रुग्ण आढळले असून कालपेक्षा 6 कमी रुग्ण समोर आले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एका मृत्यूची नोंद देखील झाली आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 44 कोरोनाबाधित आढळले असून 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 314 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 44 रुग्णांपैकी 7 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 387 बेड्सपैकी केवळ 90 बेड सध्या वापरात आहेत.



राज्यात 237 नवे कोरोनाबाधित


राज्यातील कोरोनाबाधितांची (Corona Update) संख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 237 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 455  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज  दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,21, 365 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के झाले आहे.  


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha