Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) नव्या कोरोनाबाधितांची संख्या आजही कायम राहिली आहे. नव्या 128 कोरोनाबाधितांची नोंद आज झाली आहे. कमी रुग्णसंख्येमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई पालिका प्रशासन (Mumbai BMC) निर्बंधामध्ये आणखी शिथिलता आणणार का? हे पाहावं लागेल. मुंबईत आज एकाही कोरोनाबाधिताचा (Corona Deaths) मृत्यू झालेला नाही.


मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 128 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 200 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 014 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 128 रुग्णांपैकी 15 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 102 बेड्सपैकी केवळ 721 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.



रुग्णदुपटीचा दरही वाढला


मुंबईतील रुग्ण दुपटीच्या दरातही आज मोठी वाढ झाली आहे. काल 4 हजार पार गेलेल्या या दरात आज आणखी वाढ झाली आहे. सध्या मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 4 हजार 238 इतका झाला आहे. मुंबईत सद्यस्थितीला एकही इमारत सील करण्यात आलेली नाही.


पालिका शाळा सुरु होणार?


मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.  मुंबईत दररोज 100 ते 200 रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर मार्चपासून मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या पूर्वीच्या वेळेनुसार 100 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भरवण्याचा विचार सुरू आहे. लवकरच या संदर्भातील  परिपत्रक काढले जाणार आहे. कोरोनापूर्वी ज्याप्रमाणे शाळांचे वेळापत्रक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha