मुंबई : राहुल गांधींना मानहानीच्या खटल्यात कोणताही दिलासा नकार देत मुंबईतील कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाविारेधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी करणारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी यांचा अर्ज महानगर दंडाधिकारी न्यायालयानं शनिवारी नामंजूर केला. त्यामुळे या खटल्याला आता या दोन्ही बड्या नेत्यांना सामोरं जावंच लागेल.
संघ कार्यकर्ते ध्रुतीमन जोशी यांनी न्यायलयात दोन्ही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. हा दावा रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी दंडाधिकारी पी.आय. मोकाशी यांनी फेटाळून लावली. यावरील पुढील सुनावणी 6 जानेवारी 2020 होणार आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी आणि येचुरी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत जोशी यांनी मुंबईच्या कोर्टात ही याचिका केला आहे. या वादग्रस्त विधानांमुळे आरएसएसची प्रतिम मलिन झाली, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
राहुल गांधी आणि सिताराम येचुरी यांनी जाहीरपणे केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे आरएसएसची प्रतिमा झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र हा दावा खोटा असून यासंदर्भात दाखल हा दावा रद्द करण्याची मागणी राहुस गांधी आणि सिताराम येचुरी यांच्यावतीनं कोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी दंडाधिकारी न्यायाधीश पी.आय. मोकाशी यांनी फेटाळून लावली. यावरील पुढील सुनावणी 6 जानेवारी 2020 होणार आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी आणि सिताराम येचुरी यांनी या हत्याकांडाला आरएसएस जबाबदार असल्याची आक्षेपार्ह विधान केली ज्यामुळे संघटनेची त्यातील सदस्यांची तसेच पदाधिका-यांची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत जोशी यांनी मुंबईच्या कोर्टात ही याचिका केला आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतील अन्य कोर्टातही भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तींविरोधात विवादास्पद वक्तव्य केल्याविरोधात मनाहानीचे खटले दाखल असून त्यावरही सुनावणी सुरू आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतील अन्य कोर्टातही भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तींविरोधात विवादास्पद वक्तव्य केल्याविरोधात मनाहानीचे खटले दाखल असून त्यावरही सुनावणी सुरू आहे.