मुंबई : कोरोना बाधित रुग्णांनासाठी कस्तुरबा रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालयातील आयसोलशन वॉर्ड्समधल्या अस्वच्छतेबाबत काही तक्रारी समोर आल्या. त्यामुळे या रुग्णल्यातून करोना बाधित रुग्णांचे पळून जाण्याचा प्रकारही घडले. या घटना लक्षात घेऊन सरकारने तात्काळ खाजगी रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्ड्स स्थापन करण्यासाठी पाचारण केले.
सरकारच्या या आदेशानुसार मुंबईतील खाजगी रुग्णालयांनी असे आयसोलेशन वॉर्ड्स स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांची संख्या वाढत असून सरकारी यंत्रणांवर ताण येऊ शकतो यासाठी आता खाजगी रुग्णालयांच्या मदतीने कोरोनाच्या उपचार यंत्रणेला हातभार लागणार आहे.
मुंबईतील या खाजगी रुग्णालयात स्थापन झालेत आयसोलेशन वॉर्ड्स :
एच एन रिलायन्स - 2
जसलोक - 2
नानावटी - 4
बॉम्बे हॉस्पिटल - 4
कोकिळाबेन हॉस्पिटल - 17
फोर्टीस, मुलुंड - 2
रहेजा - 22
हिंदुजा - 16
माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या सर्व रुग्णालयांची पाहणी केली. या कक्षात नेमणूक करण्यात आलेल्या डॉक्टर्स कर्मचार्यांशी संवाद साधला आणि त्यांचे कौतुक केले. WHO च्या गाईडलाईन्सनुसार या आयसोलेशन वॉर्ड्समध्ये सर्व नियमावली आणि उपाययोजनांची पूर्तता केली आहे का याचा आढावा घेतला.
येत्या काही दिवसांमध्ये कोरोना बधितांच्या वाढत्या संख्येचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारकडून या अतिरिक्त यंत्रणांचा फेरआढावा घेतला जाईल. गरज पडल्यास या आयसोलेशन वॉर्ड्समधील बेड्सची संख्या वाढवली जाईल अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिलीय.