ठाणे : ठाण्यात बरेच दिवसांनी एक सकारात्मक आणि आनंदाची बातमी आली आहे. ठाण्यातील दोन covid-19 ची बाधा झालेले रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी एक हा कासारवडवली येथील रुग्ण होता तर दुसरा दोस्ती विहार येथे राहणारा रुग्ण होता. याच सोबत ठाण्यात आज एका covid-19 च्या रुग्णाची भर पडून आतापर्यंत 26 जणांना covid-19 ची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
ठाण्यात पहिला रुग्ण हा फ्रान्स करून आलेला कासारवडवली येथीला रहिवासी होता. ट्रान्सफर भारतात आल्यावर दोन ते तीन दिवसांनी त्याला covid-19 अशी लक्षणे आढळून आल्याने कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही दिवसातच औषधोपचार घेऊन तो पूर्ण बरा झाला. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले.
ठाण्यातील दुसरा रुग्ण हा सात एप्रिल रोजी पूर्ण बरा होऊन घरी आला आहे. हा रुग्ण लंडन येथून भारतात आला होता. त्यावर मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 14 दिवसांनंतर त्याची covid-19 ची चाचणी निगेटीव्ह आल्याने त्याला आता घरी सोडण्यात आले आहे. या दोन्ही केसेस ठाणेकरांसाठी सकारात्मक बातमी घेऊन आल्या आहेत.
दुसरीकडे ठाण्यात आज एका नवीन रुग्णांची भर पडली. रूग्ण जसलोक हॉस्पिटलमध्ये कॅशियर या पदावर कामाला होता. त्याच्यावर जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ठाण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 26 इतकी झाली आहे. सर्वात जास्त रुग्ण हे कळवा विभागात आढळून आले आहेत.
तसेच मुंब्रा या विभागात देखील काल आणखीन एक covid-19 चा रुग्ण आढळून आला. हा रुग्ण मुंब्रा चे असलेल्या काळसेकर रुग्णालयात सुपरवायझर या पदावर कार्यरत होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने काळसेकर रुग्णालय सील केले आहे.