मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांना त्याची झळ बसली आहे त्यापासून मेटल आणि स्टील मार्केट सुद्धा वाचलेलं नाही. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिण्यापासून मेटल आणि स्टील मार्केट बंद आहे. त्याचा फटका व्यारपाऱ्यांना बसत आहे. अखेर मेटल आणि स्टील मार्केट पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी "मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन"ने मुख्यमंत्री दरबारी हाक दिली आहे. मार्केटची अंदाजे वार्षिक उलाढाल 70 हजार कोटी इतकी आहे. एक लाख लोकांचा उदरनिर्वाह या बाजारपेठ मुळे चालतो. मात्र आता विविध संकट या बाजारपेठ पुढे उभं राहिलेलं आहे. याच समस्या घेऊन "मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन"ने मुख्यमंत्र्यांची भेच घेतली.


लोखंड आणि स्टील हे किती महत्त्वाचा आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. व्हेंटिलेटर बनवण्यापासून ते शस्त्र निर्माण करण्यॉपर्यंत लोखंड आणि स्टीलचा उपयोग केला जातो. लॉकडाऊन झाला असल तरी आवश्यक वस्तूंची निर्मिती थांबलेले नाही त्यामुळे लोखंड आणि स्टीलचा वापर हा सुरु आहे. मार्केट बंद असल्यामुळे इतर राज्यात सुरू असलेल्या मेटल आणि स्टीलच्या व्यापाऱ्यांना ऑर्डर मिळत आहे ज्यामुळे मुंबईतील व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

नेमक्या अडचणी कोणत्या?

  • एक लाख पेक्षा अधिक लोकांचा रोजगार यावर अवलंबून

  • आगाऊ मिळालेल्या ऑर्डर पूर्ण होत नसल्याने आर्थिक नुकसान

  • इम्पोर्ट आणि एक्स्पोर्टसुद्धा मोठ्या प्रमाणात होत नसल्यामुळे कित्येक कोटींचा माल व्यापाऱ्यांनी साठवून ठेवला आहे.

  • व्यापाऱ्यांचं नुकसानच प्रमाण वाढत राहील्सवव्यवसाय बंद करणे आणि दुसऱ्या राज्यात व्यवसाय करण्यासंदर्भात विचार होऊ शकतो


हातगाडी ओढणाऱ्या मजुरांनपुढेसुद्धा हे मार्केट कधी सुरू होईल याची प्रतीक्षा आहे. गेली 2 महिने हाताला काम नसल्याने एक वेळेच्या जेवणाचा पण प्रश्न निर्माण झाला आहे. काही व्यापारी स्वतःहून यांना जेवण देत आहेत तर कधी कधी यांना उपाशी राहावं लागतं आहे. गावी जाऊ शकत नाही आहे कारण गावी काही काम नाही.

मासमाने राज्य सरकारला हे मार्केट लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली आहे. सोबतच कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन काटेकोर पणे केलं जाण्याच आश्वासन मासमाकडून देण्यात आलं आहे.