मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता दोन हजारच्या जवळ गेला आहे. यात मुंबईतील धारावी, मालेगाव आणि नागपुरात आज नव्याने कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, पुण्यात आज दोन बळी गेलेत. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक नर्सला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या संपर्कातील 25 नर्सेसला क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्येच 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आलीय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व संवेदनशील भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे.


कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून आताच्या घडीला राज्यात एक हजार 895 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याने राज्याचे संपूर्ण लक्ष या शहरात लागले आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 4641 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.


मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सात वर; 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण सात वार्डमध्येच


रॅपिड टेस्टिंगला विलंब?
केंद्रातून परवानगी मिळूनही राज्यात रॅपिड टेस्टिंगची अमलबजावणी होण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड - 19 साठीच्या चाचण्या आणखी वेगाने होणं गरजेचं आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन आठवड्यांपूर्वी घोषणा करूनही अद्याप रॅपिड टेस्टिंगला राज्यात हिरवा कंदील मिळालेला नाही. स्वॅब टेस्टिंगच्या तुलनेत रॅपिड टेस्टिंग चाचण्या 100 टक्के अचूक निकाल देतील याची शाश्वती नसल्याचं अधिकाऱ्यांमधील एका गटाचं मत आहे. त्यामुळे रॅपिड टेस्टिंगमध्ये जर कोविड - 19 चे पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह आले तर या संकटात भर पडू शकते, अशी काहींना भीती आहे. कोविड - 19 च्या निदानासाठी रॅपिड टेस्टिंग प्रमाण मानलं जात नसलं तरी सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ही पद्धत प्रभावी असल्याचं मानलं जात आहे. रॅपिड टेस्टिंग आणि स्वॅब टेस्टिंगमधला मूळ फरक आहे तो निकालाच्या वेळेचा. पारंपरिक स्वॅब टेस्टिंगचा निकाल कळण्यासाठी जवळपास 24 तास लागू शकतात तर रॅपिड टेस्टिंगच्या माध्यमातून अवघ्या 10 ते 15 मिनिटात रिझल्ट कळू शकतो.


Corona Around the World | जगभरात कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती काय आहे? World Corona Update