कळवा प्रभाग समिती मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर मुंबई आणि ठाणे इथल्या वेगवेगळ्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातच सोमवारी विटावा येथे आणखीन एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने पालिकेने कडक पावले उचलली आहेत. कळवा प्रभागात पूर्णतः शट डाऊन जाहीर करण्यात आले असून फक्त मेडिकलची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कळव्यात पुढचे आठ दिवस कोणत्याही वस्तूसाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडता येणार नाही. अगदीच आपत्कालीन परिस्थिती असल्यास बाहेर पडता येईल.
VIDEO | मातोश्रीजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे 170 सुरक्षारक्षक बदलणार
कळव्यातील पारसिक नगर, मनिषा नगर, विटावा अशा वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत मात्र तरीही इथली गर्दी कमी होण्याचे नाव घेत नव्हती. भाजीपाल्यासाठी आणि आवश्यक कामासाठी सांगून अनेक लोक सतत घराबाहेर रस्त्यावर फिरताना दिसून येत होती. ही गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी खासगी वाहनांवर बंदी देखील आणून पाहिली. मात्र तरीही नागरिक ऐकत नसल्याने अखेर पालिकेनेच सोमवारी कठोर निर्णय घेऊन पूर्णतः कळवा शट डाऊन केले आहे.
या काळात जर कोणाला भाजीपाला किंवा इतर जीवनावश्यक वस्तू हवे असतील तर पालिकेने जारी केलेल्या फोन नंबर वर फोन करून आपण ती घरपोच मागवू शकता. ही सेवा निशुल्क पालिकेतर्फे देण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने स्थानिक दुकानदार यांचे फोन नंबर जाहीर केले आहेत.
दरम्यान राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात 120 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 868 वर पोहोचली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
VIDEO | 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होईल हे गृहीत धरू नका, लॉकडाऊनसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य