मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे. मुख्यमंत्री आजच्या संवादात काय बोलणार? राज्यात निर्बंध शिथिल होणार का? झाला तर कुठे कुठे होईल? याविषयी उत्सुकता लागली आहे.
मुंबईत सामान्यांसाठी लोकल सुरू होणार?
मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट 1 पेक्षाही खाली आलाय. अॅक्टिव्ह आणि नव्या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल सुरू करण्यासंदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील दुकनांच्या वेळा संचारबंदी आणि इतर निर्बंधांबाबतही निर्णयाची शक्यता आहे.
हॉटेलच्या वेळेत वाढ होणार?
बार अँन्ड रेस्टॉरंट यांची 4 वाजेपर्यंतची वेळ ठेवली. तीच वेळ कायम ठेवल्याने बार अँन्ड रेस्टॉरंट असोशिएशनद्वारे नाराजी व्यक्त होत आहे. बार अँन्ड रेस्टॉरंट यांची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.
व्यापारी, हॉटेल चालकांना दिलासा मिळणार?
राज्यातील व्यापारी संघटनेने व्यापार, दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल काय निर्णय घेतील, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष आहे.
वीकेंड लॉकडाऊन संपणार का?
तिसऱ्या टप्यातील नियमांप्रमाणे संध्याकाळी 4 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकाने शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश लागू आहेत.
राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली पाहिजे अशी मागणी सातत्याने समोर येत आहे राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवार पैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल. आता या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आज जाहीर करतात का याची उत्सुकता आहे.