मुंबई : राज्यात आज 4 हजार 878 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1 लाख 74 हजार 761 इतकी झाली आहे. आज नवीन 1 हजार 951 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 90 हजार 911 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 75 हजार 979 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 245 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनच्या चिंता वाढल्या आहेत.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 9 लाख 66 हजार 723 नमुन्यांपैकी 1 लाख 74 हजार 761 (18.07 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 78 हजार 33 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 38 हजार 866 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 1 हजार 951 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.02 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 90 हजार 911 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.


राज्यात आज 245 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 95 मृत्यू गेल्या 48 तासांमधील तर उर्वरित 150 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे.


Nashik | हॉस्पिटल बेडचं अॅडमिशन अधिकाऱ्यांच्या हातात हवं, पालकमंत्री भुजबळांचे अधिकाऱ्यांना आदेश