मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मुंबई कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा दुप्पट आहे. आज मुंबई एकूण 2554 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5240 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. 


मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 94 हजार 859 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण 51 हजार 380 आहे. कोरोना दुप्पटीचा दर आता 116 दिवसांवर गेला आहे. तर कोरोना वाढीचा दर (27 एप्रिल-3 मे) 0.58 टक्क्यांवर गेला आहे. 






मुंबईतील कालची कोरोना आकडेवारी


मुंबईत काल 2662 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर काल मुंबईत 5746 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 


राज्यात आज 51,880 नवीन रुग्णांची नोंद


आज राज्यात 51 हजार 880 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे आज राज्यात तब्बल 65 हजार 934 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.16% एवढे झाले आहे. राज्यात आज 891 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ
टेस्टिंगमध्ये कुठेही घट न होता. कोरोनाची रुग्णवाढ, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर, डिस्चार्स झालेल्या रुग्णांची कमी होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 84.7 टक्के आहे तर देशाचा रिकव्हरी रेट हा 81 टक्के आहे. त्यामुळे  राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षा जास्त आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. 


राज्यात 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट
राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे 18 लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.