ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. ठाण्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येला ब्रेक लागला आहे. मागच्या पाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा आकडा हा 154 आहे. मृतांचा आकडा तीनवर स्थिरावला आहे. गेल्या तीन महिन्यात रोजची आकडेवारी पाहिली तर रुग्नसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.


ठाण्यातील पालिका प्रशासन आणि कोरोना योध्ये यांच्या दिवसरात्र केलेल्या मेहनतीला फळ मिळत आहे. सुरुवातीस पाचशेच्यावर गेलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत डिसेंबर महिन्यात चांगलीच घसरण झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यात 200 च्या आसपास सापडणारे रुग्ण आता शंभरीच्या आसपास आलेले आहेत. मागील पाच दिवसात नवीन सापडणाऱ्या रुग्णांची संख्या 125 च्या आसपास स्थिरावलेली आहे. तर या पाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा आकडा हा 154 एवढा आहे.


ठाण्यात 5 डिसेंबर रोजी रुग्णांची संख्या ही 154 होती. 6 डिसेंबरला रुग्ण संख्या 129, 7 डिसेंबरला 105, 8 डिसेंबर रोजी 119 तर बुधवारी रुग्णसंख्या 127 एवढी आहे. तर मृतकांचा आकडा या पाच दिवसात तीनवर स्थिरावला आहे. पाच दिवसात 7 डिसेंबर रोजी मात्र मृतकांचा आकडा 2 वर आलेला होता. ठाणे पालिका प्रशासनाच्या वाढविलेल्या चाचण्या, कोरोना बाधित आणि संशयितांची आकडेवारी ही सव्वाशेच्या आतबाहेर स्थिरावलेली आहे. ठाणे पालिका डिसेंबर महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या कोरोना लाटेच्या तयारीत असतानाच कोरोनाचा पराभव ठाणेकरांनी सुरक्षेच्या उपाययोजनेमुळे होत असल्याचे चित्र आहे.


कोरोना लस प्राधान्यक्रमाने दिली जाणार : टोपे


कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर 50 वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरणा पूर्ण झाल्यावर सर्व 50 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. 11 कोटींपैकी 3 कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करुन मतदान बूथप्रमाणे लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर 30 मिनिटे तिथं बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस वाशी येथील केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी 16 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचंही टोपे म्हणाले.


WEB EXCLUSIVE | कोरोना लसीकरणासंदर्भात सर्व तयारी पूर्ण : मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल