नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या दिवसाला दीड हजारांच्या घरात गेली आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरू लागल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या महानगरपालिका कोरोना हॉस्पिटल आणि खाजगी रूग्णालयांवर ताण येऊ लागला आहे. कोरोना पॉझिटिव्ह संख्या अशीच वाढू लागल्यास उपचार करणे हाताबाहेर जाऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिकेच्या शाळा कोरोना सेंटरमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका शाळांमध्ये कोरोना सेंटर सुरू करण्यास कमी कालावधी आणि कमी खर्च लागणार असल्याने काही शाळांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान शहरात 4 हजार कोरोना बेड उपलब्ध असल्याने पेशंटवर योग्य उपचार होत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.


नवी मुंबई महानगरपालिका आणि खाजगी रूग्णालय असे मिळून सध्या 4 हजार कोरोना बेड शहरात उपलब्ध आहेत. मात्र वाढती कोरोना पॉझिटिव्ह संख्या पाहता अजून 3 हजार कोरोना बेड जादा तयार करण्यात येणार आहेत. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने शहरातील मोकळ्या जागा आणि खाजगी जागांची पाहणी केली. मात्र मोकळ्या जागांवर आणि खाजगी जागेत कोरोना सेंटर उभे करण्यास कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे उपलब्ध इमारतींमध्येच कमी खर्चात कोरोना सेंटर कसे सुरू होईल, यासाठी मनपा प्रशासनाने विचारविनमय सुरू केला आहे. 


Corona Update | राज्यात आज विक्रमी 59907 कोरोना बाधित रुग्णांची वाढ, 30296 रुग्ण कोरोनामुक्त


शहरात महानगरपालिका  मराठी शाळांच्या अनेक इमारती आहेत. सुसज्ज अशा शाळांच्या इमारती असल्याने त्याच ठिकाणी कोरोना सेंटर उभे करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला आहे. स्वत:च्या इमारतीxमध्ये कोरोना सेंटर सुरू केल्यास कमी खर्च लागणार असून तयार केलेले फर्निचर भविष्यात वापरता येणे शक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबईत पल्स पोलिओच्या धर्तीवर कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यासाठी पालिकेची तयारी- इक्बाल सिंह चहल


नवी मुंबईतील कोरोना बेडची सद्यस्थिती  



  • एकूण कोरोना बेड - 4000

  • ॲाक्सिजन बेड - 2100 (सध्या 60 टक्के उपलब्ध)

  • आयसीयू - 436 (सध्या 27 उपलब्ध)

  • व्हेंटिलेटर -163 (सध्या 71 टक्के उपलब्ध)